Rs. 350.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

व्होल्टेर यांनी एका ठिकाणी म्हटले होते की, “जीवनात 'योगायोग' अशी गोष्टच नाही. या शब्दाची निर्मिती आपणच केली आहे.. ज्यावेळी एखाद्या घटनेमागील गूढ किंवा कार्यकारण भाव आपण सांगू शकत नाही, त्यावेळी 'योगायोग' असा शब्दप्रयोग आपण करतो.” अंकाच्या निर्मितीमागेसुद्धा एक गूढतत्त्व...

  • Book Name: Ank Jyotish Ek Chamatkar (अंक ज्योतिष एक चमत्कार) By M Kattakar
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 06
  • Barcode 817425112
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Ank Jyotish Ek Chamatkar (अंक ज्योतिष एक चमत्कार) By M Kattakar
- +
व्होल्टेर यांनी एका ठिकाणी म्हटले होते की, “जीवनात 'योगायोग' अशी गोष्टच नाही. या शब्दाची निर्मिती आपणच केली आहे.. ज्यावेळी एखाद्या घटनेमागील गूढ किंवा कार्यकारण भाव आपण सांगू शकत नाही, त्यावेळी 'योगायोग' असा शब्दप्रयोग आपण करतो.” अंकाच्या निर्मितीमागेसुद्धा एक गूढतत्त्व आहे. प्रत्येकाच्या जीवनात अंकांचे अस्तित्व सतत प्रकर्षाने जाणवत असते. गणित शास्त्रातील सर्वसाधारण नियमांची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता यालाच अंकज्योतिष म्हणतात. अंकज्योतिष ही एक भाषा आहे, तिचे नियम आहेत, सिद्धांत आहेत, तिची नामे, सर्वनामे क्रियापदे आहेत आणि त्या सर्वांना अर्थ आहेत. या पुस्तकात अंकांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्व व त्यामागील गूढ अर्थ लेखकाने अत्यंत सखोल जाऊन विषद केला आहे. एक चिनी म्हण आहे. "कदाचित एखादा पर्वत इकडून तिकडे हलवता येईल, परंतु माणसाच्या स्वभावात बदल घडवून आणणे महाकठीण आहे." अंकज्योतिषातील चमत्कार काय असतात ते, हे पुस्तक वाचल्यानंतरच लक्षात येते. नावात बदल करून किंवा आपल्या भाग्यांकाचा उपयोग करून आपले भविष्य कसे यशस्वी करता येते याबद्दलचे उपयुक्त मार्गदर्शन यात आहे. आजचा दिवस, चालू महिना किंवा चालू वर्ष कोणत्या दृष्टीने भाग्यकारक आहेत, तसेच वैवाहिक साथीदाराची निवड कशी करावी, लॉटरीत किंवा घोड्याची शर्यत यात आपले नशीब कसे उजळेल, हरवलेल्या वस्तूचा शोध कसा करावा इ. अनेक उपयुक्त व व्यावहारिक गोष्टींचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने मोठ्या समर्थपणे केला आहे. “अति बुद्धि प्रामाण्यवाद किंवा शास्त्रीय विचारंचा अतिरेक यामुळे, सत्य शोधण्यात अडथळे निर्माण होतात. शास्त्रातील अति कठोरपणा किंवा धर्मांधता यामुळे मनुष्य जनावरासारखा होतो. सूक्ष्म निरिक्षण करण्यास शिका, त्यावर विचार करण्यास शिका व एखादी गोष्ट शास्त्रीय विचारांच्या पलिकडे असूनही जर सत्य असेल तर त्यावर निष्ठापूर्वक विश्वास ठेवा.