स्वातंत्र्य मिळालं. नवविचारांचे वारे वाहू लागले. तरीही सर्वसामान्य मध्यमवर्गीय आपल्याच कोशात गुरफटलेले होते. महिला सबलीकरण असा शब्दही अस्तित्वात नव्हता. अशावेळी एका सुसंस्कृत, संपन्न घराण्यातल्या सुविद्य तरुणीनं सुखवस्तू जीवनाऐवजी पोलीस सेवेतील खडतर वाट शोधली. महाराष्ट्राची ती पहिली महिला फौजदार ठरली. हे एक विशिष्ट मानवक्षेत्र होतं. गुन्हेगारी, हेव्यादाव्यांचं विश्व होतं. तिनं खूप भलेबुरे अनुभव गाठीस बांधले आणि 'कर्तव्य प्रथम' म्हणून जिद्दीने घर, संसार, करियर या चक्राला सामोरी गेली... महाराष्ट्राच्या पहिल्या महिला फौजदार कुसुम देव यांचं
आत्मकथन एका बिकट वाटेची कहाणी आहे.
उत्कर्ष प्रकाशन
उत्कर्ष प्रकाशन, पुणे ४ दूरध्वनी : २५५३७९५८, २५५३२४७९