"भारताची गंगा ही अशी एक विशेष नदी आहे की जिच्यावर आम्हा भारतीयांचे फार फार प्रेम आहे. या लाडक्या नदीच्या भोवती भारतवासियांच्या अनेक स्मृती गुंतलेल्या आहेत. भारताच्या जातीय स्मृती आशा, भय, विजयोन्मादाची गाणी, ते विजय आणि त्याचबरोबर पराभवाच्या स्मृतीही गंगामातेच्या अवतीभवती गुंफलेल्या आहेत. भारताची वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती, जी सतत बदलती म्हणून सतत वाहाती आणि तरीही ती एकच रूप धारण करणारी, म्हणूनच त्या संस्कृतीचे जागतेबोलते प्रतीक म्हणून गंगेकडेच बोट दाखवता येईल... अशी गंगामाता भारताच्या भूतकाळाचे स्मृतिचिन्ह असून वर्तमानकाळ तिच्या स्वरूपात वाहात आहे व भविष्यकाळाच्या विशाल समुद्रात गंगेचा प्रवाह जाऊन मिळतो आहे."
जवाहरलाल नेहरू
उत्कर्ष प्रकाशन
उत्कर्ष प्रकाशन
डेक्कन जिमखाना, पुणे. ४