ज्येष्ठ अॅडव्होकेट (वकील) किशोर य. माने, गेली २० वर्षे दिवाणी व या कायद्याशी संलग्न दावे हाताळीत आहेत. तसेच त्यांनी १० ते १५ वर्षे, दिवाणी कायदा व इतर कायद्याचे ज्ञानार्जन पुण्यातील विधीमहाविद्यालयांमध्ये केले आहे. आज त्यांचे शिक्षित विद्यार्थी वेगवेगळ्या न्यायालयात यशस्वी अॅडव्होकेट (वकील), या नात्याने दिवाणी/फौजदारी व इतर दावे चालवित आहेत. तसेच न्यायालयात यशस्वी न्यायाधीश होण्याचे भाग्य लाभले आहे. कार्पोरेट विधीक्षेत्रात उच्चपदावर काम करीत आहेत. त्यांनी सरकारी नोकरीत काम करीत असताना, कायदा विभागात योगदान दिले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठामधून 'विधिनिष्णात (बाह्य) (मास्टर ऑफ लॉज) व 'डिप्लोमा इन लेबर लॉज व लेबर वेलफेअर' विशेष प्राधान्यासह पूर्ण केले आहे. सरकारी नोकरीत कामगारांचे प्रश्न कायदेशीर सल्ल्याच्या मार्गातून यशस्वीरित्या सोडविले आहेत व आजही कामगारांना कायदे सल्ला देण्याचे काम करीत आहेत. तसेच ते 'युनायटेड इंडिया इन्सुरन्स कंपनी, नॅशनल इन्सुरन्स कंपनी व सहकारी बँकेचे पॅनल अॅडव्होकेट (वकील), सिद्ध शक्ती कुंडालिनी मेडीटेशन ट्रस्ट (इंटरनॅशनल) चे कायदे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ते ज्येष्ठ नागरिकांना 'मोफत कायदे सल्ला' देण्याचे काम करीत आहेत.