हे मराठीतील एक लोकप्रिय लेखक आहेत. एकोणीसशे चाळीमध्ये त्यांची पहिली कथा 'स्त्री' मध्ये प्रसिद्ध झाली. इतका प्रदीप काळ आघाडीवर राहणारा त्यांच्यासारखा दुसरा लेखक नसेल, त्यांचा पहिला कथासंग्रह 'पांढरे पेशांचे जग' एकोणीसशे पंचेचाळीस साली प्रसिद्ध झाला. आजपर्यंत त्यांच्या नावावर जवळजवळ पस्तीस कथासंग्रह आहेत. त्यांच्या 'राक्षस' कथेस अतिरराष्ट्रीय पारितोषिक मिळाले. श्री. ज. नी एकूण नऊ कादंबऱ्या लिहिल्या. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर लिहिलेल्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रात्मक कादंबरीने मराठीत तशा कादंबऱ्यांचे नवीन दालन सुरू झाले. या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व तिला राज्यपुरस्कार लाभला.......... संतति- नियमनाचा प्रचार करणाऱ्या समाजस्वास्थ्यकार र. धो. कर्वे यांच्या जीवनावरची त्यांची 'रघुनाथाची बखर' ही अतोनात गाजली. पेशवाईच्या अस्तापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतची मराठी मध्यमवर्गाची वैचारिक आंदोलने या दोन कादंबऱ्यांत चित्रित झाली आहेत. 'पुणेरी' हा त्यांचा लेखसंग्रहही वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. हरिभाऊ आपटे यांच्या काळातील बालविधवेपासून आजच्या 'स्वतंत्र ' स्त्रीपर्यंत त्यांच्या लेखणीने नाते प्रस्थापित केले आहे. श्री. ज. ना कुणी पांढरपेशांचे बखरकार म्हणतात, पण खरे तर जुन्या आणि नव्या विचारप्रवाहांचा कलात्मक आविष्कार कुठे जाणवत असेल तर तो श्री. जं. च्या लिखाणातच !
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.