लेखकाचा अल्प परिचय
द्विपद्वीधर तंत्रज्ञ, अन्य अनेक विषयांतील अभ्यासक्रम पूर्ण, १९७५ पासून स्वतंत्र व्यवसाय. यात तांत्रिक शिक्षण-प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाच्या देशी-परदेशी यंत्रसामग्रीचा वितरणाचा व्यवसाय. सुमारे वीस परदेशी उत्पादकांची अखिल भारतीय वितरणाची जबाबदारी. त्यांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक गौरव प्राप्त. व्यवसायानिमित्त संपूर्ण भारतभर तसेच युरोपमधील बहुतेक देशांत विस्तृत भ्रमण. खेरीज गुंतवणूक, निर्यात प्रकल्पसल्ला वगैरे अन्य क्षेत्रांतही काम. गेली तीसहून अधिक वर्षे सातत्याने वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकांतून इंग्रजी व मराठीमध्ये विविध सामाजिक समस्यांवर व अन्य विषयांवर लिखाण. 'वृत्तपत्र लेखन : तंत्र आणि मंत्र' हे संशोधनपर पुस्तक वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिणाऱ्यांसाठी उपयुक्त. 'तुमचे भवितव्य तुमच्या हाती' या व्यवसाय मार्गदर्शनपर पुस्तकाच्या प्रकल्पास रोटरी इंटरनॅशनलचा 'सिग्निफिकंट अचिव्हमेंट पुरस्कार'. तसेच, महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण संचालनालयातर्फे संदर्भ ग्रंथ म्हणून शिक्षण संस्थांना या पुस्तकाची शिफारस करण्यात आली आहे. उत्कर्ष प्रकाशनतर्फे तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित. शिवाय रोटरी साहित्य मराठीत आणण्यासाठी अथक प्रयत्न. गेल्या दहा वर्षात रोटरीविषयक अनेक पुस्तके, पुस्तिका, लेख, पत्रके प्रकाशित. ९१-९२ साठी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३० चे मंडलाध्यक्ष (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) म्हणून यशस्वी कारकीर्द.