डॉ. एम्. कटककर हे पुणे विद्यापिठाच्या वाणिज्य शाखेचे पदवीधर असून जवळ जवळ ३० वर्षे त्यांनी विविध उद्योगक्षेत्रातून जबाबदारीच्या जागेवर कामे केली व ते १९८० साली आपल्या जबाबदारीतून निवृत्त झाले.
अनेक गोष्टींचा व्यासंग असलेले डॉ. एम्. कटककर १९४२ सालापासून ज्योतिष क्षेत्रात उतरले. हस्त सामुद्रिक व अंकजोतिष हे त्यांचे खास आवडीचे विषय. त्या विषयांवर त्यांनी २० पुस्तके लिहिली व त्यांची पुस्तके जवळ जवळ १५० देशात लोकप्रिय झाली. १९४६ पासून त्यांनी लेख लिहिण्यास सुरवात केली व इ. स. २००० पर्यंत हजारो लोकांना विनामूल्य मार्गदर्शन केले.
डॉ. एम्. कटककर यांचा संशोधकाचा पिंड आहे. त्यांनी हस्तसामुद्रिक
व अंकज्योतिष या विषयांत संशोधन करून नवीन नियम बसविले आहेत. वरील दोन्ही विषयाव्यतिरिक्त वास्तुशास्त्र, फेंगशुई, टॅरॉट काडर्स, लोलक विद्या या ज्योतिषशाखांचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे.
"सुलभ वास्तुशास्त्र" हे सर्वांना उपयुक्त असे पुस्तक आहे.