काही कलाकृती या वेगळ्या वाटेने जाणाऱ्या असतात. आशय, अभिव्यक्ती, आणि परिणाम या बाबतीत या कलाकृती वाचकाला एक वेगळाच अनुभव देतात. अशा कलाकृतींचा परिणाम आनंददायी असतोच असं नाही. जेव्हां एखादी कलाकृती एखाद्या समाजसमूहाला अस्वस्थ करते तेव्हां अशा कलाकृती वादग्रस्त बनतात.
अशाच काही वादग्रस्त कलाकृतींचा घेतलेला हा वेध ! कलाकृतीच्या निर्मितीची कथा, तिचा आशय, तिने समाजमनावर केलेला परिणाम आणि त्यातून समाजात निर्माण झालेले वादाचे तरंग याचे मनोवेधक वर्णन या पुस्तकात केलेले आहे. एका वेगळ्या विषयावरचे हे अनोखे पुस्तक वाचकांना नक्की आवडेल.