'योग' हा एक व्यायामाचा प्रकार आहे अशी चुकीची कल्पना प्रचलित आहे, भारतीय संस्कृतीनुसार आत्म्याची परमात्म्याशी एकरुपता साध्य करण्यासाठी उपयोगात आणावयाची ती एक जीवनपध्दती आहे, योगाच्या परिभाषेत या स्थितीला 'समाधी' अवस्था असे म्हणतात, पतंजली ऋषीनी 'योगसूत्रे' हा आपला ग्रंथ इ. सनाच्या दुसऱ्या शतकांत लिहिला असावा. 'योग' म्हणजे काम यावर शास्त्रशुध्द पध्दतीने लिहिला गेलेला हा पहिलाच ग्रंथ होय. या ग्रंथात योगाचे तंत्र आणि आचरण याचे सर्वंकष विवेचन आहे. प्रा. पांडा यांनी योगाचे तंत्र व आचरण यांची आयुष्यभर उपासना केली, एक व्रत म्हणून त्यांनी योग साधना केली. या ग्रंथांत त्यांनी पातंजल योगाची आठही अंगे विस्ताराने वर्णिलेली आहेत. धारणा, ध्यान आणि समाधी यांचे सुस्पष्ट विवेचन करून त्यांनी या तिन्हींच्या अभ्यासाने शरीर व मन या दोहोंचे संतुलन कसे साधता येते ते दाखवून दिलेले आहे. पहिल्या भागांत त्यांनी ध्यान धारणा कशी करावी, त्यासाठी कोणत्या आसनांत बसावे आणि श्वासोश्वासावर कसे नियंत्रण ठेवावे ते सांगितलेले आहे. दुसऱ्या भागांत त्यांनी पतंजली ऋषींचे योग विषयक सिध्दान्त विषद करुन सांगितले आहेत आणि ते आधुनिक शास्त्रानुसारही कसे बरोबर ठरतात ते दाखवून दिले आहे. तिसऱ्या भागामध्ये ध्यान धारणा आणि योगिक क्रिया केल्यामुळे शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक प्रगती व रोग निवारण कसें साध्य होते ते शास्त्रीय दृष्टिकोनांतून स्पष्ट करुन सांगितले आहे. संस्कृत भाषेंतील वेगवेगळ्या संज्ञा आणि त्यांचे अर्थ यांचे विस्तृत असे परिशिष्ट शेवटी जोडलेले आहे. वैद्यकीय व्यावसायिक, संशोधन करणारे आणि सर्व सामान्य व्यक्ती यांना हे परिशिष्ट अतिशय उपयुक्त ठरेल. प्रा. नृसिंग चरण पांडा हे एक बहुआगामी व्यक्तिमत्व आहे. शास्त्रज्ञ, संस्कृतंज्ञ, तत्त्वज्ञानी, मानसशास्त्रज्ञ, तांत्रिक, योगी आणि साहित्यकार असे त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. भौतिक शास्त्र व माया. स्पंदणारे विश्व मानस आणि परामानस (Mind and Supermind) दोन भाग आणि चक्रीम विश्व (Cychie Universe) दोन भाग अशी त्यांची ग्रंथ संपदा आहे. पवित्र, परिपूर्ण व सर्व समावेशक असा त्यांचा दृष्टिकोण आहे.