कथा, कविता, प्रवास वर्णन, नाटक या क्षेत्रांप्रमाणेच कादंबरी क्षेत्रात सबंध महाराष्ट्रातील वाचक वर्गाच्या मनात स्थान मिळविणाऱ्या सौ. कुसुम अभ्यंकर यांची ही नवीन कादंबरी! प्रसंगाची सुरेख गुंफण, सहजसुंदर, रसाळ व ओघवती भाषा- शैली, मनावर सहज उसणारे व्यक्ती- चित्रण हे त्यांच्या कादंबरी लिखाणाचे खास पैलू आहेत. प्रत्येक कादंबरीतील वेगळा विषय, वेगळी कलाकृती, सूक्ष्म निरीक्षण शक्ती व ढंगदार लेखनशैलीने सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचकांचे मन खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या सिद्धहस्त लेखणीत आहे, याची ग्वाही मराठी वाचकाने दिली आहे. त्या अन्टायर अिरटीश वेऊन एम. ए. उत्तीर्ण झाल्या असून बी.ए. ला त्यांना शिवाजी विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आहे, नाट्य, गायन, याबरोबरच उत्कृष्ट वक्तृत्वाची निसर्गदत्त देणगी त्यांना लाभली आहे. खेळ, नर्सिंगचे शिक्षण घेऊन पती डॉ. श्री. अभ्यंकर यांना व्यवसायात मदत करण्यातही त्या मागे नाहीत. या सावीत शेवटी म्हणजे रत्नागिरी तालुक्यातून त्या आमदार म्हणून दोनदा निवडून आल्या आहेत.