"घाणेरीची फुलं" हा लहान मुलांच्या व्यक्तिचित्रांचासंग्रह पण अगदी वेगळा, अस्वस्थ करणारा, मन खिन्न करणारा. ज्या वयात मुलं मायेच्या सावलीत, घराच्या उबेत वाढतात, शाळेत जातात, मोठी होतात, त्यांच्या मनाच्या पाकळ्या उमलतात, त्या वयात परिस्थितीच्या वणव्यात सापडल्यावर त्यांची मने कशी होरपळून जातात याचे चित्रण रामनाथ चव्हाण यांनी या व्यक्तिचित्रामधून केले आहे. या मुलामुलींच्या जीवन काहाण्या वाचतानां अंत:करण पिळवटून जातेत्यांनी हे सारं कसं सोसलं असेल याचा विचार करतानां मनात काहुर उठतं परिस्थितीचे चटके हा शब्द त्यांच्या बाबतीत अपुरा आहे. जी वणव्यातूनच चालली आहेत. --- श्री. चव्हाण यांनी ही व्यक्तिचित्रे रेखाटतानां या मुलामुलींच्या जीवनातील दाहक वस्तुस्थितीचे असे दर्शन घडविले आहे की, त्यामुळे वाचक अंतर्मुख होऊन त्याला ही स्थिती कांही करुन बदलली पाहीजे असे तीव्रतेने वाटेल.