५८वर्षांच्या प्रदीर्घ ग्रंथालय जीवनात ज्ञानसंपादन कसे करावे, ते वाचकांपर्यंत कशा प्रकारे पोचवावे, त्याचबरोबर स्वत:ही ज्ञानसमृद्ध कसे व्हावे, जीवनात संकंटांशी सामना कसा द्यावा, यशस्वी कसं व्हावं आणि अत्युच शिखरं कशी गाठावीत याविषयीचे अनुभव आणि मजेदार किस्से या आत्मकथनात दिले आहेत. नोकरी करत पीएचडी पदवी जशी संपादन केली तसेच ५० वर्षे अध्यापन करत बेस्ट टीचर अॅवॉर्ड मिळविले. ७५ ग्रंथ आणि अनेक शोध निबंध लिहून लेखनालंकार निर्माण केले. तसेच विद्यापीठ ग्रंथालयाचे विभाग आणि सेवा यांचा अनेक बाजूंनी विस्तार केला. हस्तलिखितांचे जतन संरक्षण, पु.ल.देशपांडे मुक्तांगण दृक्श्रवणालयाची स्थापना, पश्चिमघाट प्रकल्प, ग्रंथालयाचे संगणकीकरण जसे केले तसेच ग्रंथालयशास्त्र विभागात शिक्षणाच्या नवीन सुविधा उत्पन्न करुन दिल्या. संगणकाची प्रयोगशाळा भारतामध्ये प्रथमच स्थापना केली. दिल्ली येथील यूजीसी, डीएसटी, इग्नू इत्यादी संस्थांत कार्य केले. आयुष्यभर वाचकांना संदर्भ सेवा दिली. असे तृप्त वाचक हीच त्यांची कमाई. हा दीर्घ प्रवास वाचकांना मनोरंजक वाटेल..