द्विपदवीधर तंत्रज्ञ अन्य अनेक विषयातील अभ्यासक्रम पूर्ण, १९७५ पासून स्वतंत्र व्यवसाय. त्यांत तांत्रिक शिक्षण प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाच्या देशी-परदेशी यंत्रसामुग्रीचा वितरणाचा व्यवसाय. सुमारे २० परदेशी उत्पादकांची अखिल भारतीय वितरणाची जबाबदारी. त्यांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक गौरव प्राप्त. व्यवसायानिमित्त संपूर्ण भारतभर तसेच युरोपमधील बहुतेक देशात विस्तृत भ्रमण. खेरीज गुंतवणूक, निर्यात, प्रकल्पसल्ला वगैरे अन्य क्षेत्रातही काम. गेली ३० हून अधिक वर्षे सातत्याने वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकातून इंग्रजी व मराठीमध्ये विविध सामाजिक समस्यांवर व अन्य विषयांवर लिखाण. "वृत्तपत्र लेखन तंत्र आणि मंत्र” हे संशोधनपर पुस्तक वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिणाऱ्यांसाठी उपयुक्त. “तुमचे भवितव्य तुमच्या हाती” या व्यवसाय मार्गदर्शनपर पुस्तकाच्या प्रकल्पास रोटरी इंटरनॅशनलचा “सिग्निफिकंट अचीव्हमेंट पुरस्कार” तसेच हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण संचालनालयातर्फे संदर्भ ग्रंथ म्हणून शिक्षण संस्थांना शिफारीत. उत्कर्ष प्रकाशनतर्फे तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित. शिवाय रोटरी साहित्य मराठीत आणण्यासाठी अथक प्रयत्न. गेल्या १० वर्षात रोटरीविषयक अनेक पुस्तक, पुस्तिका, लेख, पत्रके प्रकाशित. ९१-९२ साठी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३० चे मंडलाध्यक्ष (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) म्हणून यशस्वी कारकीर्द. वृत्तपत्रलेखक संघटनेच्या अधिवेशनात "समाजभूषण” हा पुरस्कार, इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटीतर्फे "विजयरत्न” पुरस्कार, इंटरनॅशनल विद्यापीठातर्फे सन्माननीय डॉक्टरेट व इन्स्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्सतर्फे फेलोशिप मिळाली. असे अनेक प्रसंगी गौरव. सध्या पुणे विद्यापीठात सेवाभावी संस्थांचे व्यवस्थापन या विषयावर संशोधन चालू. अनेक सभा, संमेलने, विचारमंच वगैरेतून देशी-परदेशी भाग व भाषणे. एक बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध. लेखन, वाचन संगीत श्रवण, छायाचित्रण, समाजसेवा वगैरेत रस. अनेक सांस्कृतिक, औद्योगिक, समाजिक व व्यावसायिक संस्थांचे सदस्य.