"हस्तसामुद्रिक विज्ञान" हा सामुद्रिक शास्त्रावरील एक अनमोल ग्रंथ आहे. या ग्रंथात ज्योतिषविषयक मांडलेल्या संकल्पनेमुळे ज्योतिषविषयक सर्व वाद 'नाहीसे होतील व पराविज्ञानशास्त्र म्हणून याला जागतिक स्तरावर मान्यता मिळेल या ग्रंथात हिंदु पद्धतीनुसार हस्तसामुद्रिकशास्त्राचा विस्तार केला असून, हात बघताच भविष्यकथन कसे करावे याचे सुलभ मार्गदर्शन केले आहे. प्रत्यक्ष हाताचे ठसे देऊन हातावर विविध चिन्हे, उदा- यवचिन्ह, नक्षत्रचिन्ह, फुलीचिन्ह, चौकोनचिन्ह, वगैरे कशी असतात व दिसतात हे दाखविले आहे. दत्तक योग, घरजावई योग, जन्माबद्दलचे गूढ, प्रेमसंबंध या संबंधी हातावरील लक्षणे याचे उपयुक्त विवेचन केले आहे. त्याबद्दलचे लेखकाचे स्वतःचे अनुभव ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. पुनर्जन्माबद्दल आलेला अनुभव सुद्धा लेखकाने मनोरंजकदृष्ट्या व कौशल्याने हाताळलेला आहे.