म्हटले तर जीवन हा एक रुक्ष प्रवास होऊ शकतो आणि म्हटलं तर त्यात आलेल्या संमिश्र अनुभवातून एक जीवनगाणे तयार होऊ शकते. माझे बालपण अगदी लहान गावात गेले. आज गृहीत धरल्या जाणाऱ्या
अनेक सुविधा त्या काळी तिथल्या जीवनात नव्हत्या. पण त्यामुळे फारसे काही बिघडले असे आजही वाटत नाही. इंजिनिअर झाल्यावर कूपर आणि टाटा कंपनीत नोकरी केली आणि मग स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र व्यवसायात पदार्पण केले. तो सांभाळून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) झालो. देश-परदेशात भरपूर प्रवास केला. व्यावसायिक, सामाजिक, सेवाभावी संस्था, संघटनांत काम करण्याची संधी मिळाली आणि तिथे जमेल तसे योगदान देत गेलो. लेखनाच्या आवडीमुळे अनेक पुस्तके, लेख, पुस्तक परीक्षणे, काही पुस्तकांना प्रस्तावना लिहायची आणि यातून मराठी भाषेची सेवा करण्याची संधी मिळाली. या सर्व प्रवासातून व्यक्तिमत्त्व विकास होत गेला, लोका वाढत गेला आणि एक जीवनगाणे तयार झाले. या जीवन प्रवासाच घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.