संसाराचं गणित काहींना जमून जातं, काहींना चक्रावून सोडतं. संसारात, समाजाच्या दिखाऊ व सुखवस्तू कळवळ्यात गुंतून स्वतःचं घर विसरणारे पतिपत्नी आहेत, चित्रपटांप्रमाणेच आयुष्य असतं असं गृहीत धरणारी स्वप्नाळू मुलं आहेत, लाचलुचपतीचा पैसा घरात नको असं वाटणाऱ्या कुटुंबाचा प्रमुखच पैसा खाणारा असतो, नाकासमोर चालणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या सहकारी गृहसंस्थेची, तिच्या प्रवेशद्वाराशीच कोंडी करणारा, राजकीय आश्रय असलेला गुंड आहे, 'चांगलं वाग' असा उपदेश करण्याचा गुन्हा करणाऱ्या आईला घराबाहेर काढणारा 'सुपुत्र' आहे. सासूमधील सासूपणा दूर करून तिच्यातील आईपण जागविणारी चतुर सूनही आहे कथेतील म्हणजे जीवनातील पात्रं समजूतदार असतील, तर गणिते सोपी होतात. पात्रं हटवादी असतील, तर सोपी गणितं अवघड होऊन बसतात! महाबळ, त्यांच्या खास शैलीत, या संग्रहात संसारातील गणितं मांडतात.