एकविसाव्या शतकात संगणक व मोबाईल क्रांतीने जीवन पद्धतींचे सर्व संदर्भ बदलेले आहेत.-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने , बदल घडताना आपूण पाहतो आणि अनुभवतो आहोत. ह्या सर्ब प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान (इन्फर्मेशन ऍडकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी - खउट) सर्वात आघाडीवर आहे. ह्यामुळे, पूर्वी अँसलेले, अंतराचे बंधन आता नाहीसे झाल आहे आणि आज सर्वांना सर्वप्रकारची माहिती मिळू शकते तसेच परस्परांशी गतिशील •संवादही, होऊ शकतो.- अशा प्रकारे सर्वे जग जोडले जाऊन 'ग्लोबल व्हिलेज' हा संकल्पना प्रत्यक्षात उत्तरली आहे. आज ह्या संवादासाठी आपणांस फक्त संगणकावरच अवलंबून राहावे लागत नाही. खरे तर सेलफोन आजचा फिरता संगणक बनला असून • सेलफोनमार्फत आपण अनेक गोष्टी स्वस्तात सहजपणे आणि आपल्या पसंतीच्या ठिकाणाहून करू शकतो. स्मार्ट ह्या शब्दाचा मला आवडलेला अर्थ म्हणजे चतुर. आजकाल शहरे स्मार्ट होऊ लागली आहेत, आसपासची उपकरणे पण स्मार्ट होऊ लागली आहेत. पण व्यक्तींचे कायं. एकविसाव्या शतकातील डिजिटल अर्थव्यवस्थेत साहित्यिकांनी पण स्मार्ट (व्यवहारचतुर) व्हायला हवं. आपलं नाणं खणखणीत असले तरी त्याचा आवाज सर्वत्र' 'खणखणायला हवा. ह्या पुस्तकात स्मार्ट गिरीच्या काही धोरणात्मक टिप्स दिल्या आहेत. डिजिटल अर्थव्यवहार, सोशल मीडिया, मार्केटिंग, बँकिंग/अर्थव्यवहार, माहितीची निर्मिती, पुर्ननिर्माण, ब्लॉगिंग, इंटरनेटचा सुलभ वापर अशा अनेक बाबी ह्या पुस्तकात हाताळल्या आहेत. आपले व्यक्तिमत्व लोभस, हसतमुख तर आहेच पण 'आपले सायबर अस्तित्व तसेच आहे का. भौतिक व सायबर ह्या दोन्ही पातळ्यावर चातुर्थ आपल्याला अजून यश मिळवून देईल. खर तर हे पुस्तक लिहायचा हाच खरा हेतू आहें.