'मुले म्हणजे देवाघरची फुले' असे सानेगुरूजी म्हणायचे, हे सर्वश्रुत आहे तसे कौतुकाने सांगितलेही जाते परंतु आचरणात मात्र आणले जात नाही, आचरणात आणायचे म्हणजे काय तर मुलांना खरोखरच फुलांसारखे गोंजारायचे, वेळच्यावेळी पण आवश्यक तेवढेच खतपाणी देऊन फुलांना जसे वाढवतो तसेच मुलांना वाढवायचे, फूल फूलल्यावर त्यांकडे जसे कौतुक भरल्या नजरेने बघतो तसेच प्रगती पथावरील मुलांकडे बघायचे, हेच नजरेस आणून देणारे हे लेखन दोन धडे शिकवावे असा वडिलकीचा आव आणून झालेले नसून मित्रत्वाच्या स्नेहल भावनेने केलेले आहे.