भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या ऐका वेगळ्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणाऱ्या एकमेवाद्वितीय नेत्यांमध्ये शेठ वालचंद हिराचंद यांची गणना होते. स्वतंत्र भारताच्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन त्यासंबंधी कार्य करणे अशी ही स्वातंत्र्य चळवळ होती. ब्रिटिश साम्राज्यातील प्रतिकूल वातावरणातही आपल्या अतुलनीय धैर्य, निष्ठा आणि आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर शेठ वालचंद हिराचंद यांनी भारतीय औद्योगीकरणाचा पाया रचला. स्वतंत्र भारताच्या औद्योगिक गरजा ओळखून जल, भूमी आणि आकाश यांसारख्या मूलभूत क्षेत्रात उद्योग स्थापन केले. शेठ वालचंद हिराचंद यांच्या कर्तृत्वाची पार्श्वभूमी आणि त्यांचे योगदान याबद्दल वाचकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या हेतूने त्यांचे चरित्र प्रकाशित होत आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्याच शब्दात सांगायचे झाले तर त्यांचे जीवन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर चिकाटीने मिळविलेल्या विजयाची कहाणी.'
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.