सत्ताबदलाच्या पाठीमागे काही सो जसाची लागतात। त्या सूर्याचे कौटिल्य अर्थशास्त्रात झालेले गलन है केवल अपूर्व आहे। मानवी स्वभावामुळे सदैव निर्माण होणाच्या राजकीय आणि । प्रादेशिक परिस्थितीवरील ते एक चिरंतन भाष्य आहे आणि या चिरंतन भाष्याचा आधार घेऊन लिहिलेली ही कादंबरी म्हणूनच कधी प्रासंगिक ठरणार नाही. कारण २५०० वर्षांपूर्वी जो इतिहास घडला त्याची पुनरावृत्ती आजपर्यंत अनेकदा झालेली आहे आणि यापुढेही ती होत राहील. तिच्यातील सत्य है सतत टिकणारे आहे; जुलमाविरुद्धचा एक लढा वर्णन करणारी ती एक ललित कती एवढीच तिची मिती नाही किंवा इतिहासाला दिलेले। ललित स्वरुप अशी तिची दुसरी मिती नाही. मुद्राराक्षस किंवा अन्य ग्रंथावर ती आधारीत नाही. चाणक्याने, सत्तेवरील राजाचा कसा पराभव करावा यासाठी योजलेल्या अनेक कपट नाट्यांची ती कथा नाही. राक्षस अमात्याला स्वामिनिष्ठेपेक्षा राष्ट्र निष्ठा महत्वाची असते हे सांगून । समर्थ चंद्रगुप्ताच्या बाजूकडे कसे व का वळविले हे सांगणारी जरी ती कथा दिसली तरी तिच्यामध्ये अनेक मुद्दे अभिप्रेत आहेत. महाभारत काळापासून एका समृद्ध राष्ट्राची वेळोवेळी समृद्धीमुळे किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रसंगामुळे कशी स्थिती होते, मनुष्यातील मर्मस्थाने ही राजकारणातील वर्मस्थाने कशी ठरतात हे सांगणारी आणि चिरंतन मुल्यासाठी कसे झगडावे लागते । हे सांगणारी ती एक कृती आहे. सनावळी सांगणारी किंवा इतिहासातील पात्रांना काही कल्पित संवाद सांगायला लावणारी ती एक कंटाळवाणी कथा नाही.
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.