सरिता पदकी
अनेक साहित्यपुरस्कारांनी गौरविलेल्या ज्येष्ठ लेखिका
कथाकार, नाटककार, कवयित्री, अनुवादक,
बालसाहित्यकार ह्या रुपांमध्ये मराठी वाचकांनी
त्यांना स्वीकारलेलं आहेच. त्याच मालिकेतली ही
त्यांची अखेरची अक्षरभेट.
'कांचनसंध्या' जीवनाच्या सोनेरी संध्याकाळी त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह. 'हा वाचण्याने जुन्या वाचकांना सरिताबाईंच्या पुनर्भेटीचा आनंद मिळेल तर नव्या वाचकांना त्या नव्याने समजतील. '