मी स्वतःला भाग्यवान समजतो की पुढच्या काळात मी सुगम संगीताच्या क्षेत्रातील सर्व मान्यवर दिग्गज कलाकारांच्या रंगमंचीय कार्यक्रमातून निवेदन केलं ! भावगीताचे जनक गजाननराव वाटवे ते पं. हृदयनाथ मंगेशकर ते यशवंत देव ते सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अरुण दाते, श्रीधर फडके, श्रीकांत पारगावकर, उत्तरा केळकर, देवकी पंडीत, अनुराधा मराठे, आरती अंकलीकर-टिकेकर, शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, सलील कुलकणी, राहुल देशपांडेते आजच्या पिढीतील मधुरा दातार, बेला शेंडे, विभावरी जोशी आर्या आंबेकर अशा सर्वांचा समावेश आहे.
चित्रपट, दूरदर्शन मालिका, नाटक, शिक्षण क्षेत्र, उद्योग यातल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या.
एका टप्प्यावर मी आगदी कृतकृत्य झालो, तो म्हणजे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची मुलाखत घेण्याचा आलेला अपूर्व योगः दुसरं म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या 'रंगवाणी' (या नाट्यगीतांच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याच भाग्य; आणि अजून एक माझा सर्वात 'वीक पॉइंट' पु. ल. देशपांडे यांच्या ७५री आणि ८० व्या वाढदिवसानिमित्त कलल्या 'पुलकित गाणी' या कार्यक्रमाचं निवेदन आणि त्याला पुलंनी दिलेली दाद !
या तीन गोष्टींनंतर असं वाटलं की आता यापुढे कोणताही कार्यक्रम मुलाखत हे नाही मिळालं तरी चालेल!