कोणी कुणाचा जयजयकार करीत नसतो की कुणाचा निषेधही करीत नसतो. माणसांच्या सोयीप्रमाणे हे शब्द त्याच्या मदतीला येत असतात. 'इन्कलाब जिन्दाबाद !'चे दिवस जसजसे विस्मरणात जाऊ लागले तसतसा नवा आशय.... एक विकृत...... असंबद्ध आशय या शब्दांना येऊन मिळू लागला, त्याचा सात्क्षाकार घडवून आणणारे एक कथानक आवतीभोवतीचे तुकडे गोळा करून तयार केलेला एक 'कोलाज्' माझ्यापुढे उभा राहिला. तो या कादंबरीत जमा केला आहे. कित्येक युद्धे अर्धी सोडावी लागतात. काहीवेळा तहनामे करावे लागतात. तहनामे करताना जीवापाड जपलेले मूल्यांचे किल्लेही सोडून द्यावे लागतात. त्यातून जे साधले जाते त्याची लाज वाटते. आपल्याला जपण्यासाठी हे सर्व केले. मग माझाच 'जिन्दाबाद' ज़िन्दा आबाद म्हणजे जिवंत आहे म्हणून मी आबाद आहे. काही वेळा तू मुर्दा असशील तर मी आबाद आहे. मी मला 'जिन्दा' ठेवण्यासाठी तुझा 'मुर्दा' पाहतो. मी जिन्दाबाद ! मीच मुर्दाबाद !
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.