दीपा गोवारीकर
तसं पाहिलं तर या कथासंग्रहातील कथा समाजाच्या एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधीत्व करतात. तो म्हणजे सरत्या विसाव्या शतकातील समदुःखी आणि समसुखीही, पांढरपेशा संसारी स्त्रियांचा असं सरसकट लेबल या कथांना लावणं एकपरीनं सोयीचं असलं तरी प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाला वैयक्तिक तपशील असतातच, आणि ज्या त्या व्यक्तीचे त्यावरील वेगळाले मात्रावळसेही असतात. कधी स्वतः शोधलेले, तर कधी दैवामुळे लाभलेले. तरी मनःशांतिसाठी. प्रत्येकाचा, प्रत्येकीचा यत्न चालू राहतो. या कथासंग्रहाच्या वाचकाला कथा वाचताना काही आनंद म्हणा, आत्मप्रत्ययाचे क्षण म्हणा, लाभले तर ते त्या कथेचं तिच्या पायापुरेसं यश.