सुमारे तीस वर्षांपूर्वी या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. गोव्यांच्या स्वातंत्र्य संग्रामात मी माझा 'खारीचा वाटा उचलला होता. गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामापूर्वी, गोव्याची सामाजिक परिस्थिती कशी होती, गोव्यात लोह खनिजाच्या उत्खननाचा धंदा कसा चालला होता, त्याचे गोव्यातील अर्थव्यवस्थेवर कसे परिणाम झाले, याचे चित्र मी या कादंबरीत रंगविलेले आहे.
स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्यामुळे मला आलेले अनुभव मी या कादंबरीत मांडले आहेत. या कादंबरीतील एकही पात्र पूर्णपणे काल्पनिक नाही. फक्त नावे बदलली आहेत. तसेच सर्व पात्रे प्रातिनिधिक व्हावी असा प्रयत्न केलेला आहे. • खाण उद्योगामुळे गोव्यातील भातशेती, सुपारीच्या व नारळीच्या बागा आणि निसर्ग संपत्ती
यांचा कसा विनाश झाला त्याचे चित्र मी या कादंबरीत रेखाटले आहे. आमची सुपारीची बाग कशी.
नष्ट झाली ते मी पाहिले आहे. बागायती नष्ट झाल्यामुळे किती कुटुंबे देशोधडीला लागली तेही मी
पाहिले आहे. या सर्वांचे यथार्थ दर्शन या कादंबरीतून वाचकांपर्यंत पोचविण्याचा हा प्रयत्न आहे.
आजही खाण उद्योगामुळे गोव्यातील निसर्गसंपत्तीचा विध्वंस तसाच चालू आहे. गोव्यातील
निसर्ग आणि पर्यावरण, हा खाण उद्योग ओरबाडून खात आहे. खाणमालक आणि त्यांना संरक्षण देणारे सरकारी अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे पर्यावरण रक्षणासाठी सरकारने केलेले कायदे पूर्णपणे निरुपयोगी ठरले आहेत. हे असेच चालू राहिले तर एक दोन दशकांत गोवा पूर्णपणे उजाड होऊन जाईल. "How green was my Goa' असे म्हणण्याचे
पाळी गोमंतकीयांवर येईल.खूप मोठ्या प्रमाणावर मजूर आणि पर्यटक यांच्या आगमनामुळेही गोव्यातील सामाजिक परिस्थिती पार बदलून व बिघडून गेली आहे.
या कादंबरीची पहिली आवृत्ती संपूनही वीसेक वर्षेझाली. श्री. जोशी (उत्कर्ष प्रकाशन) यांनी मनावर घेतल्यामुळे ही दुसरी आवृत्ती निघत आहे. त्याचा मला आनंद आहे. श्री. जोशी यांचा मी
कृतज्ञ आहे. गोवा विद्यापीठात मराठी विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना "एक प्रादेशिक कादंबरी" म्हणून पुरवणी वाचनासाठी या कादंबरीची शिफारस करण्यात आली आहे असे अलीकडेच समजले आहे.