उत्साहपर्व एकेकाळी ५५ हे निवृत्तीचे वय आणि ६० ही वृध्दत्त्वाची परिसीमा गणली जात असे. तथापि बदलत्या जीवनपध्दतीनुसार आता वयाचा ६० ते ७५ हा काळ माणसाच्या उमेदीचा गणला जाऊ लागला आहे. या वयोगटातील व्यक्तींचे समाजातील प्रमाणही सतत वाढते असून त्यांच्यापैकी कितीतरी जण आपल्या आवडीच्या व्यवसायात वा कार्यक्षेत्रात मोठ्या उत्साहाने रत असलेले आढळतात. अशा कर्मकुशलांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा परिचय समाजाला व्हावा म्हणून उत्तररंगमध्ये १९९६ पासून अजुनी जयांचा उत्साह उदंड हे सदर देण्यात येते. त्यातील निवडक ५० लेखांचा हा संग्रह उत्साहपर्व नावाने प्रसिध्द होत आहे. यामध्ये जीवनाच्या विविध क्षेत्रात महनीय कार्य केलेल्या स्त्री-पुरुषांच्या जीवनकथा आहेत. त्यांत काही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नामवंत जसे आहेतच तशीच आपल्यातली सामान्य गणली गेलेली माणसेही आहेत. मात्र प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे आव्हान कसे स्वीकारले व ते जिद्दीने आणि निष्ठेने कसे पार पाडले ते पाहणे मोठे मनोरंजक आणि बोधप्रद आहे. म्हणूनच हा संग्रह केवळ त्या वयातील व्यक्तिनाच नव्हे तर प्रौढत्वाकडे मार्गक्रमण करणाऱ्या सर्वांनाच आवडेल व मार्गदर्शक ठरेल.
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.